Marathi Picnic & Trek Songs
बरेच दिवस मनात होते कि आपण कित्येक वेळेला ट्रेक ला जातो …. गाणी म्हणतो …ती एका ठिकाणी जमा करावीत … म्हणजे सर्वांनाच ती उपयोगी पडतील … आज मतदान करून सकाळीच आल्या मुळे … भरपूर वेळ मिळाला …. मग म्हटले चला काम करून टाकू … आणि हो इतक्या वर्षात मराठी मध्ये लिहिलेला हा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे … त्यामुळे लिहायला बराच वेळ लागला … असो ….
पहिले गाणे मी खूप वर्षा पूर्वी … बजाज ऑटो च्या ट्रेकिंग क्लब बरोबर गेलो होतो तेंव्हा ठोंबरे सरांकडून ऐकायला मिळाले …संपूर्ण गाणे काही आठवत नाही … नंतर त्यांना विचारून नक्की पूर्ण लिहीन …
संध्याकाळी संध्याकाळी देईन तुझ्या कानाखाली…
संध्या चे बाबा गोरे आई काळी तरीपण संध्या का काळी …
संध्याकाळी संध्याकाळी देईन तुझ्या कानाखाली….
Picnic & Trek Songs Free PDF Download
सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय – Download
Sonu tula mazyavar bharosa nahi kay Lyrics
हिच्या मागे मागे फिरतो अन पूड पूड करतो रुबाब कोणाचा हाई का
मी जरासं बोललो अन रुसून चाललो कशी हि बोलते ऐका
काय म्हणती
सोनू तुझा माह्यावर भरोसा नाय काय
नाय का
शोनु तुजा माह्यावर भरोसा नाय काय
नाय का
सोनू ची आई कशी ढेपसी
ढेपसीला आवडते पेप्सी | पेप्सी ||
पेप्सीचा आकार कसा गोल गोल
सोनू तू माह्यासंग गॉड बोल
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
हिची रोजचीच लाडी गोडी … माजी कमजोर पडतीय बॉडी
ड्रेस घालती कधी हि साडी पार बिल माज्या नावाने फाडी
हिची रोजचीच लाडी गोडी … माजी कमजोर पडतीय बॉडी
ड्रेस घालती कधी हि साडी पार बिल माज्या नावाने फाडी
हिच्या बडे ला केक अन भलतीच गिफ्ट हिला थोडीतरी जाणीव हाई का
हिच्या बडे ला केक अन भलतीच गिफ्ट हिला थोडीतरी जाणीव हाई का
परत म्हणती काय
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
शोनु चा बाप कसा टकल्या
टकल्याला आवडतात चकल्या
चकल्याचा आकार कसा गोल गोल ,,,, गोल गोल
सोनू तू माह्यासंग गॉड बोल … गॉड बोल
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
रोज बॅलन्स हिला मी करतो हिला नेटचा पॅक पण मारतो
हिला उजाळुस्तर मी बोलतो अन मनाला कसा बी झुलतो
भलतच बोलती न भांडण करती अशानं भाव अन म्हणती काय
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
सोनूचा भाव कसा लंबू
लंबूला आवडते लिंबू
लिंबूचा आकार कसा गोल गोल .. गोल गोल
सोनू तू माह्यासंग गॉड बोल … गॉड बोल
सोनूची बहीण कशी आर्टिस्ट … आर्टिस्ट
आर्टिस्टला आवडते ड्रॉईंग … ड्रॉईंग
ड्रॉईंगचा आकार कसा गोल गोल .. गोल गोल
सोनू तू माह्यासंग गॉड बोल … गॉड बोल
सोनू तुजा माह्यावर भरोसा नाय काय
आणि रात्रीचा ट्रेक असला कि हमखास शेकोटी असणारच …. मग हे गाणे म्हणायचे … म्हणजे भरपूर करमणूक पण होते …
Phaltan cha mhatara shekoti la basla
फलटणचा म्हातारा शेकोटीला बसला …
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको शेकोटीला बसली….
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी शेकोटीला बसली…
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय शेकोटीला बसली…
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय गायीचे वासरु….शेकोटीला बसले …
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय गायीचे वासरु….शेकोटीला बसले …
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय गायीचे वासरु वासराची शेपटी…….शेकोटीला बसली…
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय गायीचे वासरु वासराची शेपटी शेपटीचे केस…शेकोटीला बसले …
फलटणचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोची मुलगी मुलीची गाय गायीचे वासरु वासराची शेपटी शेपटीचे केस…केसावरची पिस्सु………..शेकोटीला बसली…
गाणे एकानी सुरु करायचे मग पुढच्यानी दुसरी ओळ म्हणायची आणि
असे चालू ठेवायचे. त्यानंतर जो हा क्रम चुकवेल तो बाद…..
Gadi mai chanan chanan hoy re
गाडी में छननन छननन होए रे (२) || धृ ||
गाडी में बैठे दो मराठी (२)
गाडी में तुझ्या आयला माझ्या आयला होए रे (२)
गाडी में बैठे दो मद्रासी (२)
गाडी में इडली सांबार वडा सांबार होए रे (२)
गाडी में बैठे दो पंजाबी
गाडी में बल्ले बल्ले बल्ले बल्ले होए रे (२)
आता हि यादी हवी तशी वाढवत नेऊ शकता …. या यादीत मग गुजराती, बंगाली, भैये वगैरे घालून गाडीची मालगाडी करता
येते. कोणातीही ओळ दोनदा म्हणताना पहिल्यांदा एकाने म्हणायची आणि दुसर्यांदा इतर सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणायची …..
Mazi ladki mazi ladki mazi ladki sushila
Ektyala mala sodun geli ho swargala
माझी लाडकी, माझी लाडकी, माझी लाडकी सुशिला
एकट्याला मला सोडून; गेली ती स्वर्गाला…. सुशिल्ला
उंच होती, टंच होती, होती ती गोरिपान
गालावर, एक तीळ, तीच माझी सुशीला…….सुशिल्ला
एक होता, सावकार, त्याची इस्टेट लाखावर
त्याला होती, एक मुलगी, तीच माझी सुशीला……सुशिल्ला
एके दिवशी, गेली होती, नदीवर पाण्याला
आणि पडली, पाय घसरुन, गेली थेट स्वर्गाला…….सुशिल्ला
धक्का बसला, म्हातार्याला, तोही गेला स्वर्गाला
मुलगी गेली…..इस्टेट गेली…..राहिलो मी एकटा……..सुशिल्ला
Bambai se aai meri maal
बम्बई से आई मेरी माल,
माल के गुलाबी गाल|| धृ ||
माल के लिए मैंने साडी मंगाई, साडी का रंग था लाल
माल के गुलाबी गाल || १ ||
माल के लिए मैंने लिप्स्टिक मंगाई, लिप्स्टिक का रंग था लाल
माल के गुलाबी गाल || २ ||
गाण्याची चाल = ‘बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो; रात को खाओ पिओ, दिन को आराम करो’
Ada mada kon pada
आदा मादा कोण पादा
दामाजीचा घोडा पादा
ठाम ठुस ठैय्या ठुस
कारे बामना पादला तुच
तेलीन बाई तेल दे
कोन पादलं सांगून दे…
Pandya pandya dukan mandya
पांड्या पांड्या दुकान मांड्या
दुकानाची किल्ली हरवली
पांड्यानं बायको झोडपली
पांड्याच्या बायकोनं मारली लाथ
पांड्या पडला संडासात
संडासात निघला साप
पांड्या म्हणे बाप रे बाप…
Sang sang sang dadhi mishya lamb
सांग सांग सांग
दाढी मिशा लांब
दाढी गेली वाया
पड माझ्या पाया
पायाखाली सुपारी
तुझा लग्न दुपारी
दुपारी आले पाहुणे
तेच तुझे मेहुणे
Zuk zuk zuk zuk agin gadi duranchya resha havet kadhi
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा, सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहून येऊया, मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं
गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया, मामाच्या गावाला जाऊया..
ग. दि. माडगुळकर
zampya chi mavshi
झंप्याची मावशी
आहे मोठी आळशी
काम काही करत नाही
पलंगावरुन उतरत नाही
हिला सारखे खायला लागते
अबब किती ‘ही’ खात असते
जेव्हा वाटते आता खाल्ले खूप
पलंगावरच घेते छान झोप
घेते जेव्हा अळोखे पिळोखे
अंगाखालून निघतात झुरुळे
एकदातर गंमतच झाली
अशीच होती सुस्तावलेली
स्वप्नात आले तिच्या रागवलेले
म्हणे ब्रम्हदेव खूपच चिडलेले
रागात त्यांनी तिला दिले ढकलून
जागी ती झाली भिऊन खडबडून
Chadi lage cham cham
छम् छम् छम् ….. छम् छम् छम्
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम
छम् छम् छम् ….. छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम् छम् छम्
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
“मोऱ्या मूर्खा- !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम
छम् छम् छम्
तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्ध्म्
छम् छम् छम्
वसंत बापट
Sonu tula sonyachi mal ghe
सोनु तुला सोन्याची माळ घे (Chorus माळ घे)
हातामधे लेडीज घड्याळ घे (Chorus घड्याळ घे)
फॉरेनची साडी घेतो गोल गोल (Chorus गोल गोल)
आता तरी माझ्याशी गोड बोल.. (Chorus गोड बोल)
सजणेSSSSS तुला विश्वास नाही का??
थांब होउ दे सकाळ (Chorus थाम्ब होवू दे सकाळ)
फुटलय आकाशी ताम्बडं (Chorus ताम्बडं)
बोलतया दाराशी कोम्बडं (Chorus कोम्बडं)
थन्डीची लाट तरी जाउदे(Chorus जाउदे)
दराशी ऊन तरी येवू दे (Chorus येवू दे)
चाळ सारी जागी तरी होउ दे ( Chorus होउ दे)
नळाला ही पाणी तरी येवु दे ( Chorus येवु दे)
सजणेSSSS, तुला जायाची घाई का ??
थाम्ब होवू दे सकाळ ( Chorus थाम्ब होवू दे सकाळ)
आता यामध्ये बरीच अजून गाणी आहेत … जी आता मी आमच्या ट्रेक ग्रुप ला विचारून नक्की लिहीन … आणि तुम्हाला आणखी गाणी माहित असतील तर जरूर कळवा …
महेश
Enlisted above are trek and picnic songs in Marathi which you can enjoy over again and again, specially when you are in a group these songs boost up your energy levels up and makes the trek memorable. so do enjoy the collection and give me feedback / addition / correction in the above listings.
cheers !
Recommended reference reading –
One day trek in Sahaydri mountain ranges – Do’s and Don’t, Things to carry list
ajit says
Mast keep it up Mahesh dada
sandeep says
खूप झान गाणी आहेत . या चे विडिओ बनवून यु टब उपलोड करा ना
Preshit Kulkarni says
Hello Mahesh, thanks for the lyrics. Can you please also make a video of songs and send us the link.
Cheers
Preshit Kulkarni
Mahesh says
sure .. as i get time during trek . i shall record live songs and share on youtube ..
Preshit Kulkarni says
Thanks!
Sudhir Kishor Desai says
There are lot many picnic songs. I listened many but never get chance to listen it gain. Your this mission is really appreciated. Keep it up.
Mahesh says
If you wish to add few more songs… You are most welcome sir
Jayuu sane says
आठवणीत आहेत ही सगळी गाणी मस्त ?
आणि मी काढलाय हा फोटू “सरसगड” ट्रेकला.. ???
Jaanaki DS says
खूप छान गाणी ??आणि मराठी लेख मस्तच अभिनंदन.????
शुभम सोंडे says
सोनु तुला सोन्याची माळ घे माळ घे
हातामधे भारी घड्याळ घे घड्याळ घे
फॉरेनची टोपी घेतो गोल गोल गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल..
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
सोनूची आई काशी डेपशी डेपशिला आवडते पेप्स
पेप्सी चा आकार कसा गोल गोल गोल गोल आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
सोनू चा बाप कसा टकल्या टकल्या टकल्या ला आवडतात चकल्या चकल्या
चकल्याचा आकार कसा गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
सोनूचा भाऊ कसा लंबु लंबु लंबु ला आवडतो लिंबू लिंबू लिंबू च आकार कसा गोल गोल सोनू तू मायाशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
फुटलय आकाशी ताम्बडं ताम्बडं
बोबंलतया दाराशी कोम्बडं कोम्बडं
आज कोंबड्यानी घातलया अंड अंड
अंड्याचा आकार कसा गोल गोल आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
थन्डीची लाट तरी जाउदे जाउदे
दराशी ऊन तरी येवू दे येवू दे
उन्हात वळवायच्यात ढोल ढोल ढोल ढोल आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
चाळ सारी जागी तरी होउ दे होउ दे
नळाला ही पाणी तरी येवु दे येवु दे
पाण्याच समजून घे मोल मोल मोल मोल आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
सोनू तूझी लाडाची हौसा हौसा
आलाय तीला लाटरीच पैसा पैसा
पैश्याच समजून घे मोल मोल मोल मोल
आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू तुया मायाव भरोसा नाय का…?
ठरलं उद्या बाजारी जायचं
100 नम्बरी सोनं तुला घ्यायचं
चावी तुझ्या हातामधे देवू का देऊ का ?
पैसे तुझ्या हातावर ठेवु का ठेऊ का?
सोनू तुला माझ्याव भरवसा नाही का….?
परवा तुझा आलाय मेव्हणा म्हेवणा
दराशी आलाय पाव्हणा पाव्हणा
पावहण्यानी केलाय मोठा झोल झोल झोल झोल आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू….तुझा माझ्याव भरोसा हाय ना….?
Mahesh says
धन्यवाद शुभम .. सोनू तुला माझ्याव भरवसा नाही का या गाण्याची अजून एक आवृत्ती सांगितल्याबद्दल
N.R. Kadam says
ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीन सळसळली ! २ !
इथ कुणी आसपास ना
डोळ्यांच्या कोनात हास ना
तु जरा मा़झ्याशी बोल ना
ओठांची मोहर खोल ना
तु लगबग जाता
माग वळुन पाहता
वाट पावलात अडखळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
उगाच भुवयी ताणुन उगाचा रुसवा
आणुन पदर चाचपुण हातान
ओंठ जरा दाबीशी दातान
हा राग जीवघेना होता
खोटा तो बहाना
आता माझी मला भुल कळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली !!
ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात नागीन सळसळली