Malshej Kite Festival – 10 – 12 January 2020 by MTDC
Dates
January 10, 11 and 12, 2020
Location
MTDC resort, Malshej Ghat, post – Khubi , Tal – junner, Dist – Pune, Maharashtra 421201
Entry Fees – 50 Rs Per Person
What to Buy
You will be able to Buy all things like Kite, kittens and other material
Also buy & enjoy various local food items, Organic fertilizers,
Events
Tribal dance, women’s lezim squad, Goof art, Bullock cart safari.
Contact phone numbers
Mr. Vishnu Gadekar (Manager of Malshejgat Tourist Residence)
Phone numbers – 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878.
The Malshej Kite Festival has been organized by the Tourism Development Corporation of Maharashtra (MTDC) at the tourist residence of Malshejghat (Dist. Pune).
MTDC Managing Director Abhimanyu Kale has urged the tourists to participate in the festival which will be held on January 10, 11 and 12, 2020.
The festival has been organized by justifying the upcoming festival. The Various events have been organized from 10am to 12pm from 9am to 7pm. There is an entry fee of Rs. 50 per person to attend the festival. There will be a stall for buying kites, kittens and other materials at the festival site. The festival is eco-friendly and all precautions and precautions will be taken to ensure no harm or injury to the animals, birds and animals in the area. No banned kittens will be used at the festival. The festival is being held for the first time and will feature non-kite kite and drone kite racing.
Abhimanyu Kale said, MTDC resorts and tourist accommodations in the state are being transformed and a special campaign has been launched to attract tourists. Under this campaign, so far, the Grapes Festival and Mango Festival have been attracted by the tourists at Malshejghat. Now through the Kite Festival, tourists are being attracted to this tourist destination again, he said.
During the festival, the tourists can enjoy various local food items made through women’s savings groups. Rural artist’s art stalls will also be set up. Also, the produce produced by organic fertilizers will be sold. Various events like tribal dance, women’s lezim squad, goof art have been organized and tourists can enjoy bullock cart safari.
Abhimanyu Kale, senior manager Khipra Bora, manager of Malshejghat tourist accommodation, Vishnu Gadekar have appealed that the tourists should participate in the maximum number of tourists and enjoy the kite festival.
For more information contact the Manager of Malshejgat Tourist Residence Vishnu Gadekar at 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878. It has been reported on behalf of MTDC.
माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून पतंग महोत्सव
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 12 जानेवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रती व्यक्ती 50 रूपये प्रवेश शुल्क आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल असेल. महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशु, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार नाही. हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
अभिमन्यू काळे म्हणाले, राज्यातील एमटीडीसीच्या रिसॉर्टस् तथा पर्यटक निवासांचा आता कायापालट होत असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत माळशेजघाट येथे आतापर्यंत द्राक्षे महोत्सव, आंबा महोत्सव यांचे आयोजन करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचतगटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादित शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.
पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अभिमन्यू काळे, वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे एमटीडीसीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Leave a Reply