पाहुणे आले कि पटकन काय करायचे असा प्रश्न पडतो अश्या वेळी पटकन करण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत साजूक तुपातली मटन ते सुद्धा पाणी न घालता अंगच्या पाण्यावर शिजवलेले लुसलुशीत मटण आणि या मटण ला आपण तव्यावर आरामात दम देणार आहोत ज्यामुळे मसाल्यांचा वास त्यातून निघून जात नाही …
Recipe Video is added at the end of this post – like it, subscribe my channel
Since last 35 years I have been to all parts of Sahyadris and tasted various local foods. So as I began my own YouTube channel, started documenting the recipes which are typically not known to many and done only in villages.
I hope you will love this Simple mutton meat recipe in Maharashtrian style which anyone can make at home with minimum preparations.
Please do try it at home and provide me feedback if you really like it so that I am encouraged to post more and more such authentic Maharashtrian recipes.
साहित्य –
- १ किलो मटण चे तुकडे,
- १/२ किलो कांदे – बारीक कापून घ्या
- १०० ग्रॅम – आले लसूणपेस्ट
- 1 वाटी साजूक तूप
- खडा मसाला –
- जिरे २ छोटे चमचे –
- वेलदोडा ४ –
- दालचिनी १/२ इंच तुकडा –
- तमालपत्र २ मोठे किंवा ४ छोटे –
- बडीशेप २ छोटे चमचे –
- काळे मिरे १०-१२
- पिसा मसाला –
- हळद १ छोटा चमचा –
- धन पावडर ३ छोटे चमचे –
- लाल मिरची पावडर ३ छोटे चमचे –
- मीठ (चवीनुसार) –
- घरगुती कांदा लसूण मसाला ४-५ छोटे चमचे
Recipe Simple mutton meat recipe in Maharashtrian style in Desi Ghee
- मटन+पिसा मसाला + मीठ
- कुकर गरम करा
- साजूक तूप गरम करा
- खड़ा मसाला घाला छान वास येईपर्यंत परता
- बारीक चिरलेला कांदा घाला चमकदारहोईपर्यंत परता
- मटण घाला थोडे ब्राउन होऊपर्यंत परता
- आता आले लसूण पेस्ट घाला थोडा वेळ परता
- आता कुकर चे झाकण लावा एक शिट्टी येईपर्यंत थांबा
- तोपर्यंत बाजूच्या गॅस वर जाड तवा गरम करायला ठेवा गॅस बारीक वर ठेवा
- आता एक शिट्टी झाल्यावर कुकर तव्यावर ठेवा गॅस मंद ठेवा 35-40 मिनिटे तसेच ठेवा (दम द्या )
- आता कुकर काढून थंड होण्याकरता ठेवा
मस्त मटण तयार आहे
चिकन करता पण हीच पद्धत वापरा – फक्त १५-ते २० मिनिटे ठेवा
Leave a Reply