Shri Chatrapati Shivaji Maharaj Slogan – श्री छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य | श्री छत्रपती शिवाजी महाराज गारद
जय जय जय जय भवानी …. जय जय जय जय शिवाजी…
महाराsssssज …
गडपती… गजअश्वपती…भूपती… प्रजापती… सुवर्णरत्नश्रीपती… अष्टवधानजागृत… अष्टप्रधानवेष्टित…
न्यायालंकारमंडित… शस्त्रास्त्र-शास्त्र पारंगत … राजनीति धुरंधर……. प्रौढप्रतापपुरंदर…
गौ- ब्राह्मण प्रतिपालक, यवन- परपीडक… क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर…
पुण्यवंत…यशवंत…नीतिवंत… राजाधिराज, महाराज, योगीराज,
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
🚩🚩 जय भवानी 🚩🚩
🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩
नोंद :
वेगवेगळ्या वेबसाईटवर हे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले आहे मी सर्व प्रकारे अचूक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे … यामध्ये काहीही सुधारणा करायचे असेल तर जरूर सुचवा 🙏
🙏आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम🙏
महाराsssssज …
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🙏🙏🙏.
गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)
भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)
अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवाजी महाराज घोषणेला शिवाजी महाराज गारद असे म्हणतात. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आहे.
प्रत्येकाला हा अर्थ समजण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.🙏
Leave a Reply