गिरिभ्रमणाच्या जगात अनेक ठिकाणी काही वाटा रात्री उगवतात.आमच्या सारख्या भटक्याना या पाऊलवाटा खुणावतात.आणि काही भटके ट्रेकेर्स काही वाटा शोधूनही काढतात. अशीच एक वाट पुण्याजवळ ची ‘कात्रज ते सिंहगड’ म्हणजेच K2S Trek. ही वाट तशी आता ट्रेक विश्वात सर्व परिचित आहे, तरीही हा ट्रेक सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे.
काय आहे तरी काय या ट्रेक मधे? तर या मधे आहे एक हटके थ्रील,स्वतःला आजमवयाची संधी,आणि त्याच बरोबर अनुभवायला मिळते ती ‘अविस्मरणीय थरारक रात्र’ अशी एक रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. मी रात्रीचे गिरिभ्रमण म्हणजे नाईट ट्रेक ऐकून होते पण,कधी केले नव्हते…मिशन k2s च्या निमित्ताने तो योग आला आणि सुरु झाली भटक्या पावलांची भ्रमंती….
आमचे टीम लीडर श्री राहुल दरगुड़े सर यानी मिशन k2s ट्रेक चा प्लान केला व पाहता पाहता आमचा 26 जणाचा ग्रुप तयार झाला. त्यानी सांगितल्या प्रमाणे 2 लिटर पाणी लिंबू सरबत, ग्लूकोज आणि जेवणाचा डब्बा हेड टोर्च आणि सर्वात महत्वाचे ट्रेकिंग शुज ग्रिप वालेच पाहिजेत अशी जय्यत तयारी करून घेतली कारण रात्रभर चालणे आणि वाटेत एकही गाव वस्ती नाही त्यामुळे पाणी कुठेही मिळणार नव्हते.
फाल्गुन पोर्णिमा शनिवार 11 मार्च 2017 हा दिवस ठरला.साधारण पोर्णिमेच्या आस पास हा ट्रेक ठरवतात त्यामुळे चंद्रप्रकाशात वाटा नीट दिसतात.
आम्ही पिंपरी चिंचवड मधुन 7:30pm ला निघालो,प्रत्येकाला बस मधे घेत घेत जुना कात्रज बोगद्या जवळ 9:30 ला पोहचलो.तेथून 10 min चालल्या नंतर, देवी चे एक मंदिर लागते.
देवीचे दर्शन घेतल्या नंतर राहुल सर उदय सर म्हणजे गुरूजी यानी सर्व ट्रेकर्स ना ट्रेक विषयी च्या महत्वाच्या सुचना दिल्या.सर्वना नंबर देऊन एकदा काउंट घेतला,आणि मंदिराच्या डाव्या बाजुने ट्रेक सुरु केला,….हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी घोषणा करीत सर्व मावळे निघाले साधारण1टेकडी चढून गेल्या नंतर विद्युत रोषणाईतले पुणे शहर दिसते.
डोंगर धारेवरची ही वाट, आम्हाला एकूण 17 टेकडया 18km अंतर 8 ते 9 तासात पूर्ण करावयाचे होते, याची कल्पना आम्हाला दिली होतीच. ही k2s ची भ्रमंती म्हणजे कुतूहल आणि भीती अशी वाटत होती जस जसे आम्ही ऐक ऐक टेकडी पार करत होतो,तस तशी भीती कमी आणि कुतूहल वाढत गेलं.एखादी टेकडी चढणे सोपे पण उतरणे तितकेच कठीण जात होते.कारण या उतारावारिल माती सैल, कोरडी आणि मुरमाड जास्त होती.त्यामुळे पाय रोवून उतरणे शक्य नव्हते म्हणून चक्क घसरगुंडी चा पर्याय निवडला आणि मस्त पैकी घसर गुंडी करत टेकडी उतरलो,तेवढाच बालपणीचा घसरगुंडी चा आनंद घेता आला.असे करत करत 3 टेकडया पार केल्यावर ऐका टेकडीवर थांबुन आमच्या लीडर ने सर्वना चिक्की वाटली आणि कोकम सरबत दिले.10 min रेस्ट घेऊन पुढे निघालो.
आता रात्रीचे 1:30 वाजले होते अजुन काही टेकडया पार केल्या नंतर एका पठारावर अजुन थोड़ी विश्रांती घेतली तिथे राजगिरा लाडू खाऊन पाणी पिऊन निघालो. साधारण दिड तसा नंतर एका पठारावर आम्ही जेवण करायचे ठरवले तेंव्हा 2:45 झाले होते व जेवणासाठी खुप वेळ थाम्बने शक्य नव्हते. ग्रुप मधील गौरी आणि हर्षदा यानी वांग्याची भाजी ठेपला सर्वा साठी आणले होते इतरानी पालकपुरी तीळपोळी आणि असेच वेगवेगळे पदार्थ आणले होते. प्रचंड थंड वारं सुटल्याने जेवण लवकर उरकले जर्किन कान टोपी असुन सुध्दा आम्ही चक्क थंडीने उड़त होतो. शुजमधे पाय ही थंड पडले होतेेच त्यामुळे जास्त वेळ थाम्बने ही शक्य नव्हते. 30min मधे आम्ही लगेच निघालो अजुन काही वेळ थांबलो असतो तर गोठलो असतो इतकं प्रचंड थंड वारं सुटलं होतं.
एक टेकडी पार केल्या नंतर लीडर ने थोड़ी वेगळी वाट निवडली आधीच धाडसी मोहिम त्यात आणखी थोड़े धाडस तोही टप्पा सर्वानी छान पार केला. आता पहाटेचे 4 वाजले होते, आमच्या ग्रुप चा लिटिल चाम्प आदित्य दरगुड़े थोडा वेळ झोपल्या मुळे आम्ही थांबलो,उदय सरांनी छान जुनी हिंदी गाणी म्हणून सर्वना खुप छान रिफ्रेश केलं. त्यावेळी चंद्र आणि त्यात न्हाहून निघणारे डोंगर सिंहगड आणि पहाटेच बारीक़ धुकं आहाहा काय अप्रतिम सौंदर्य डोळयात साठऊन घेत सर्वजण अगदी निस्तब्ध झाले होते.ऐके ठिकाणी टिपलेला चंद्र…
आता पहाटेचे 4:30 झाले होते 3 टेकडया पार करायच्या होत्या,या मात्र दम छाक करणाऱ्या होत्या इथेही घसरगुंडी चा मार्ग अवलंबून मजल दर मजल करीत अखेर शेवटचा डोंगर पार करून सिंहगड च्या पक्क्या वाटेला येऊन मिळालो. प्रत्येक वेळीच्या कठिण घसरणीने एक शिस्त शिकवली ती म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा जीव महत्वाचा असतो त्यामुळे कितीही अवघड घसरण आली तरी कुठेही घाई गडबड न करता प्रत्येक जण अगदी संयमाने शिस्तीत उतरत असत, हिच ती निसर्गातून मिळालेली स्वयंम शिस्त. आता सिंहगड चढ़ण्याचे त्राण कोणा मधे उरले नव्हते, म्हणून तिथेच आम्ही फोटोग्राफी केली, अश्या प्रकारे आमचे मिशन k2sपूर्ण.
नंतर सुमो तुन खाली बस कड़े प्रस्थान केले. या ट्रेक मधे विशेष उल्लेख करावा असा आमचा लिटिल चाम्प आदित्य जबदस्त स्टैमिना सर्वांच्या पुढे कायम असणारा खुप कौतुकास्पद म्हणजे त्याचे 22 ट्रेक पूर्ण…याला आमचा मानाचा मुजरा!!!!!!!!!!
K2S नाईट ट्रेक का करावा, एकुण17 टेकडया 18 km चे अंतर, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःची क्षमता पाहण्यासाठी आणि एक हटके थरार अनुभवण्या साठी, आयुष्या तील एक रात्र नव्हे तर एका रात्री तील अविस्मरणीय रोमांचित कुतूहल मिश्रित थरार आजमावण्या साठी आणि ट्रेक पूर्ण झाल्या नंतरच समाधान आणि आनंद याला तर सीमा च उरत नाही,असा हा K2S आयुष्यात एकदा तरी अनुभवाच………
मिशन k2s खुप मस्त पार झाले त्यासाठी मस्ती ग्रुप आणि सर्व टीम चे मनापासुन आभार.
⛳⛳⛳⛳⛳ लेखिका – सुरेखा पवार ⛳⛳⛳⛳⛳
Sushil says
Great trek. Nice blog
surekha sushil pawar says
मनापासुन खुप खुप आभार महेश सर
surekha sushil pawar says
मनापासुन खुप धन्यवाद महेश सर
Priya says
Very nice surekha..nice blog n artivle too.keep it up
Niteen says
Excellent Job Mrs.Surekha….Very Nice Blog…Keep it up.
Geeta says
Awesome blog…very well written. Keep it up Surekha
Nilesh Waghulde says
Sahi
Sheetal says
Very nice blog Surekha. Till now we were enjoying your pics of different trekkings. Now this blog explains them very well. You are just not a good trekker but you are a very good writer. Keep it up.
Dr Swati vanve says
Gr8 dear Surekha…. N congratulations… All d Best 4 future trek
Rahul Dargude says
सुरेख ब्लॉग। ?
Abhinav says
Mast blog…..???
Nikhil Inamdar says
Khup chan likhan kel ahe madam….
Tithe jaun alyacha feel Ala……?
Omkar says
Good…keep it up… pa
war.madam….
laxmi. says
Woooow!!!…..Surekha dee very nice blog.
Congratulation..
Best luck for ur future trek…
Shilpa says
Wonderful Surekha. Treking n writting … both keep it up?
Nagesh Kashid says
सुरेखा…खुप छान लिहले आहेस.तुझ्या ट्रकिंगच्या छंदाला खरच…..सलाम!!
Harshada waghulde says
Nice blog?
Pratibha says
खूप छान लेख आहे सुरेखा मौशी….
best wishes for u r next trek…
Manjiri says
Nice job done Surekha …keep it up….till now we r watching your photos…now enjoying your writing also..all the best for your future. God bless you.
असेच ट्रेक करत रहा..आणि हो लिखाण थांबवु नकोस..
Manoj says
Awesome …. Awesome…… Awesome
Keep it Up Surekha. You have lot of energy, enthusiasm and braveness to make such trek very easier.
I will join you soon.
Very Nice blog.
Dipali says
अप्रतिम लेखन