Jatyavarchya Ovya – Part 3 – ऐसा विठ्ठला सारीखा जोडा नाही बरका – Marathi Lyrics PDF Download
अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या / ऐसा विठ्ठला सारीखा जोडा नाही बरका
Jatyavarchya Ovya – Part 3 – ऐसा विठ्ठला सारीखा जोडा नाही बरका – Marathi Lyrics PDF Download
पंढरीत आलेल्या या आजी म्हणतात
ऐसा विठ्ठलासारीखा जोडा कोठे नाही
विठ्ठलाची माडी रुक्मिणं
येंगती दोरं का
ऐसा विठ्ठला सारिखा
जोडा नाही कोठे बरं का
विठ्ठलाची माडी रुक्मिणी
येंगती दमानी येंगती दमाने
चोळी भिजली घामाने छत्री धरली रामाने
विठ्ठलाला एकादस तिच्या
वटीला खारका तिच्या
वटीला खारका विठ्ठलाला
एकादस
पंढरीच्या ग वाट पेरली
खसखस
विठ्ठलाला एकादस
रुक्मिणी तोडी कवळे घोस
विठ्ठलाची माडी लांबून
दिसती पिवळी
अशी रुक्मिणं सावळी उभी
रथाच्या जवळी
विठ्ठलाची माडी रुक्मिणी
दिसती हिरवीगार
विठ्ठलाच्या माडीवर आला
तुळशीला भार
Leave a Reply