Jatyavarchya Ovya – Part 2 – चोळी शिव शिंपी दादा – Marathi Lyrics PDF Download
अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या / चोळी शिव शिंपी दादा मोती लावुन बंदायेला चोळी चालली दुरल्या देशा
Jatyavarchya Ovya – Part 2 – चोळी शिव शिंपी दादा – Marathi Lyrics PDF Download
कापली ग कणगोळी रक्त चालले झाडुन धरमाच्या दुरपदीने दिलं पारवं फाडुन
साखरेचे बाई लाडु रुकमणीनं कवा केले एवढ्या दुरपत्या बाईला मुळ हरणावती गेले
असा विठ्ठल चालत रथ राऊळाच्या कोणी
नंदच्या ग नातयाने सत्यभामा देते पाणी असा विठ्ठल चालत रथ वेशीच्या बाहेरी
आशी बोलती सासुबाई भीम अर्जुन नाही घरी
आसा विठ्ठल चालत रथ येशीच्या बाहेरी
धर्म राज पारावरी तिथं राम राम करी
असा अर्जुन बोलतो सांगा रुकमिणा काही
अशी बोलती रुकमिणी बोळवणीचा बाजार केला नाही
असा बोलतो अर्जुन सागा रुकमणी म्हण अशी रुकमणीनं बोलयेती धाडु कार्तिक होऊन
आसा बोलतो विठ्ठल घाला दुरपदीला न्हाऊ
आशी बोलती रुकमणी चला वेदनेला जाऊ
देवाला ग झाली रात
हस्तानपुरीच्या बाजारी
त्यांनी खरेदी केली बाई नव लाखाचीवलईन
अशी बोलती रुकमण चोळीला व काय दिल
असा बोलतो विठ्ठल दोईचे ग एकमोल
अशी बोलती रुकमणी चोळी शिव शिंपी दादा मोती लावुन बंदायेला चोळी दुरपत्या नंदयेला
अशी बोलती रुकमीण चोळी शिव शिंपीदादा
मोती लावुन पसापसा नचोळी चालली दुरल्या
देशा
अशी दुरपदी नेसली लाल रंगाची शेंदरी असे दुरवे धनयेच्या पड्या डोळ्याले अंधारी
असा बोलतो विठ्ठल भरा दुरपदेची वटी नंदयेच्या ग नात्याने सत्यभामा आली होती हात पाय धुवुनी दुरपदी बसलिया पडल नंदच्या ग नात्याने राही रुकमणीनं पाया पडं
Leave a Reply