Dinvishesh 28 June 1653 | Shahjada Mohommod Aazam Birthday
२८ जून १६५३: शहजादा मोहंमद आझम याचा जन्म
आझम हा मुघल बादशहा औरंगजेबाचा मुलगा. अर्थात याच्या जन्माच्या समयी औरंगजेब अजुन बादशहा झाला नव्हता. सध्याच्या मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे आझमचा जन्म औरंगजेबाची पहिली बेगम दिलरास बानू हिच्या पोटी झाला. बुर्हाणपूर येथे पुर्वी शहाजहानची बेगम मुमताज महल हिचा चौदाव्या अपत्याला जन्म देताना म्रुत्यु झाला होता.
आझमव्यतिरिक्त दिलरास बानूला औरंगजेबापासुन तीन मुली व अकबर हा मुलगाही होता. इस १६५७ मधे औरंगाबाद येथे अकबराला जन्म दिल्यावर दिलरास बानू लवकरच निधन पावली. म्रुत्युनंतर तिला ‘रबिया-उद-दुरानी’ असे नावही मिळाले.
इस १६६०-६१ मधे आझमने आईच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे एक भव्य मकबरा बांधला. पुर्वी शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता त्याच्याशी हा औरंगाबादचा मकबरा खुप साधर्म्य साधत होता. मात्र आझमने आईच्या स्मरणार्थ जरी हा मकबरा बांधला असला तरी तो ‘बीवी का मकबरा’ या नावाने ओळखला जातो.
२८ जून १६८५: मोहंमद मुअज्जम गोवळकोंड्यात दाखल.
इस १६८२ ते १७०७ अशी तब्बल २५ वर्षे मुघल बादशहा औरंगजेब दख्खनमधे लाखोंचे सैन्यासह झटत होता. यादरम्यान त्याने मराठ्यांविरूद्धच्या लढाईला काहीसी विश्रांती देत त्याची नजर आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळवली व १६८६ व १६८७ मधे अनुक्रमे आदिलशाही व कुतुबशाही युद्ध करून जिंकून घेतली.
त्याचा दुसर्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद मुअज्जमला औरंगजेबाने १६८५ मधे कुतुबशाहीवर पाठवले व त्याने गोवळकोंड्याच्या (भागानगर/हैदराबाद) किल्ल्याला वेढाही घातला. मात्र हा वेढा रेंगाळत चालला. पुढे दोन वर्षे मुघलांना काही यश आले नाही. याचे कारण म्हणजे मुअज्जम आतुन कुतुबशहाला सामील होता. औरंगजेबाला ही बातमी मिळाल्यावर तो स्वतः तिथे आला व कपटनितीने व फितुरीने गोवळकोंडा जिंकला व शहा आलम म्हणजेच शहजादा मुअज्जमला शिक्षा म्हणून पुढे ७ वर्षे कैदेत टाकले.
:- सारंग
Leave a Reply