Pune Bamboo festival at Ganesha Kala Krida Munch 2023
Bambu Mahotsav Pune 2023
Date |
22, 23, 24 December 2023 |
Time |
11 am to 8 pm |
Location |
Ganesh Kala Krida ManchSwargate, Keshav Rao Road, NH60, Beside Nehru Stadium, Shukrawar Peth, Pune, Maharashtra 411042 |
Google Location Map for Bamboo Festival of Pune 2023
पुणेकरांनो, पुणे बांबू फेस्टिवल 2023ला भेट द्या!
बांबू हा एक गवताचा प्रकार आहे. गवत जसे भरभर वाढते, तसे कापल्यावर उगवते. त्याच्या वस्तूंचे प्लास्टिकसारखे डोंगर होत नाही. कारण ती निसर्गातील गोष्ट आहे. म्हणजे बांबू हा लाकूड आणि प्लास्टिकला अनेक अंशी पर्याय आहे.
म्हणजे त्याचा वापर वाढला तर पर्यावरणातील धोके कमी होतील. म्हणून बांबू महत्वाचा आहे.
पुणे बांबू फेस्टिवल 2023मधे आपल्याला बांबूच्या असंख्य वस्तू दिसतील. फर्निचर आहे, डायऱ्या आहेत, दागिने आहेत, घर बांधायचे मटेरियल आहे, बांबूच्या धाग्यापासून बनवलेले कापड देखील आहे. किती किती गोष्टी…
हे सगळं आपण जास्तीत जास्त वापरले, तर आपली जगण्याची पद्धत शाश्वत विकास असलेली असणार आहे. त्यालाच sustainable living म्हणतात.
मी जर पुण्याची नागरिक असेन, तर माझ्या गावातील अशा शासकीय अनुदान नसलेल्या आणि कोणतेही फंडिंग नसलेल्या या महोत्सवातील वस्तूंचा प्रचार करणे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी बांबू फेस्टिवलमधे असणार आहे. ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली positive चळवळ आहे.
असंख्य हौसिंग सोसायटीच्या ग्रुप्सवर, पालकांच्या ग्रुपवर, तरुण विद्यार्थ्यांच्या ग्रप्सवर ही माहिती गेली तर, आपण लोकांसाठी लोकांनी सुरू केलेले हे अभियान यशस्वी होईल.
रोज असंख्य बिनकामाचे msgs आपण ढकलत असतो, आज हा msg जास्तीत जास्त ग्रुप्सवर share करा. कारण हा सगळयांनी मिळून ओढायचा जगन्नाथाचा रथ आहे.
पुण्यात बांबू फेस्टिवलला 22,23 आणि 24 ला भेटूया. स्थळ आहे गणेश कला क्रीडा. वेळ 11 ते 8
तळटीप : कोणत्याही राजकारणी, समाजकारणी माणसांच्या हस्ते या फेस्टिवलचे उदघाटन होणार नाही. जो प्रथम बांबूप्रेमी उपस्थित होईल, त्याच्या हस्ते फीत कापली जाईल. काय सांगावं, हा मान आपल्या कोणालाही मिळेल.
एक सजग पुणेकर
Vinod Margaje says
Noce