• Home
  • Mother’s Recipes
  • Beaches
  • Waterfalls
  • Downloads

TrekBook Blog

Your Personal Guide to India

Amazon Sale

You are here: Home / Incredible India / Places near Mumbai & Pune / One Day Trek / रानपाखरं – “कोथळीगड” ट्रेक

रानपाखरं – “कोथळीगड” ट्रेक

By Mahesh 1 Comment | Last Updated July 21, 2017

“कोथळीगड” ट्रेक

जिल्हा – रायगड,

श्रेणी – मध्यम,

उंची – ३१०० फूट, 

दि. – २८ जून २०१७

kothaligad trek

माझ्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आंबिवली गावापासून ३ कि. मी. अंतरावर कोथळीगड आहे. कोथळीगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट इतकी आहे.

“कोथळीगड”चा इतिहास थोडक्यात-शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार दारुगोळा जवळील गावातून मिळविण्याकरीता गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी मांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक दारुगोळा घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला व त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला ज्यात तो व त्याचे सैन्य मारले गेले.

कर्जतहून खेड-कडूस कडे जाणाऱ्या कोलिंबा व सावट घाटावर लक्ष ठेण्यासाठी ह्याच किल्ल्याचा उपयोग होत असे. असा ह्या गडाचा थोडक्यात इतिहास सांगितला जातो. 

दिनांक २८ जून २०१७ चा ‘फोना‘ चा ७३ वा आणि पावसातील पहिला ट्रेक आयोजित केला. पुण्यापासून कोथळीगड सुमारे ११७ कि. मी. अंतरावर आहे. इथे बस ने पोहोचण्यास किमान अडीच ते तीन तास लागतात. १८ जून ला सकाळी ६:१५ वाजता आमची बस निगडीहून तळेगाव, लोणावळा, खोपोली मार्गे ३ तासात म्हणजे ९:१५ आंबिवली गावाजवळ पोहोचली. अर्थात बसमध्येच इडली चा नास्ता करून आणि मध्ये एका ठिकाणी थांबून चहा घेतच. खोपोली सोडल्यावर कर्जत फाट्यापासून उजव्या हाताला वळून ७-८ कि. मी. अंतरावर आंबिवली हे गाव आहे. तिथून ३ कि.मी. अंतरावर कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ हे गाव आहे. बस आंबिवली गावच्या स्टॉप वर लावून लीडर ने ट्रेक विषयी सूचना देऊन लगेच ९:३० ला  ट्रेक ला सुरुवात केली.

दीड कि. मी. अंतर चालून गेल्यावर “कोथळीगड” चा देखणा नजारा डोळ्यांना सुखावणारा होता. कारण बस मधून जाताना फक्त एका वळणावरच कोथळीगड क्षणभर दिसला त्यानंतर त्याच्या जवळ गेल्यावरच त्याने खरे दर्शन दिले.

kothaligad glimpse from distance

एकीकडे प्रचंड खोल दरी तर एकीकडे आभाळाला भिडणारा कोथळीगड असे ते सुंदर दृश्य होते.फोटो काढताना खूप सांभाळून काढावे लागतात कारण जरा पाय घसरला तर थेट दरी तुम्हाला कवेत घ्यायला तयारच असते.

लिंबू सरबत पिऊन पुन्हा गडाची वाट धरली पुढे दीड कि. मी. चा चढाच्या कच्या रस्त्याने आम्ही पेठ गावात पोहोचलो. जाताना सगळ्यांसोबत माझीदेखील दमछाक झालीच होती. कारण एप्रिल च्या संधन व्हॅलीच्या ट्रेक नंतर १ महिन्याच्या गॅप नंतर चा हा माझा ट्रेक होता. पहिल्यांदा ट्रेक ला येणारे मेम्बर्स केव्हा एकदाचा गड येतो याचीच वाट पाहत होते. गडाच्या पायथ्याशी पेठ गावात सामानाची ने-आण  करण्यासाठी दोन चाकी गाडी आणि बैलगाडीचा वापर होताना दिसला.

पेठ गावाजवळ गेल्यावर कोथळीगड आणि पायथ्याशी पेठ गाव अतिशय सुंदर दिसत होते.

पेठ हे गाव २०-२५ कौलारू घरांचेच आहे. मुख्य व्यवसाय भातशेती,विजेची, पाण्याची सोय असलेले. ५वी-६ वी पर्यंत शाळा आहे. ऊन म्हणते मी. त्यामुळे  घामाने जणू आम्ही न्हाऊनच  निघालो होतो. पावसाचे दिवस असून वरून राजाने अजून तरी आम्हाला साधी नजरभेट सुद्धा दिली नव्हती. आमच्यातल्या काहीजणांचे पाणी संपत आले होते त्यामुळे आम्ही गावातल्या घरामधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुन्हा गड चढाईस सुरुवात केली. आमच्यातले २ मेम्बर काही कारणाने आम्ही येईस्तोवर पेठ गावातच थांबले. गावातून निघालो.

काही ठिकाणी भात पेरणी केलेली दिसली.१२ चे ऊन होते आणि गड चढण्याची मजा आत्ता तर खरी होती. मधेच गावातील लहान मुले पिकलेले गावरान आंबे घेऊन विकतं दिसली तसेच गावातील स्त्रिया आणि पुरुष लिंबू -सरबत विकताना दिसली. तेवढीच ट्रेकर्सना थंडाई आणि तिथल्या शेती करणाऱ्या लोकांची पोटापाण्याची सोय. शहरात आपण २०० रुपयाची कोक ची बाटली घेताना जराही विचार करीत नाही तर  मग १०-१५ रुपयांच्या नैसर्गिक लिंबू-सरबताला का विचार करावा. मी गड चढताना माझ्याकडे आपले शहरी सरबत (tang)असताना देखील २वेळा तरी लिंबू सरबत विकत घेतले.

आमच्या सोबत अजून २-४ ट्रेकिंग ग्रुप गड चढताना दिसले. चढाईची वाट खूप छोटी असल्याने अधून मधून दाटी होत होती. परंतु जस जसे उंचीवर जात होतो तसतसा जमिनीवरचा गावाचा नजारा अप्रतिम दिसत होता. आम्ही ६-७ ट्रेकर सगळ्यात पुढे पोहोचलोत्यात सगळ्यांच्या आधी पोहोचले ते श्री. संजय मोरे वय वर्षे ५५. त्यांचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. 

गडावर पोहोचताच भैरोबाचे मंदिर आणि मोट्ठी गुहा दिसली. जर रात्रीचा ट्रेक असेल तर त्या गुहेत १०० पेक्षा अधिक लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. शिवाय अजून २-३ खोल्या वेगळ्या आहेत. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरले आहेत. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसले.

bhairoba guha mandir

बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर क्षणभर विश्रान्ती घेऊन आम्ही कोथळीगडाच्या माथ्यावर जावयास निघालो. कोथळीगडाचे वैशिष्टय हेच आहे की एका भव्य पाषाणाच्या आतून त्या पाषाणाचा कोथळा पडून सुंदर पायऱ्या कोरल्या आहेत.म्हणूनच या गडाला कोथळीगड हे नाव असावे.  ते कोरीव काम पाहावे  की पायऱ्या चढाव्यात की फोटोग्राफी करावी असा आपल्याला संभ्रम पडतो. कोरीव काम करणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अप्रतिम असा तोच रस्ता बनवला आहे.

शिवाय त्या दगडी जिन्यामध्ये व्हेंटिलेशन साठी मोठं मोठे होल देखील ठेवले आहेत शिवाय एकीकडे एक मोट्ठेच्या मोठे दार ही आहे.एखाद्याच्या काळजातून सपासप अनेक बाण जावेत  तसे आम्ही त्या पाषाणाच्या कोथळ्यातून एकाच वेळी अनेक ट्रेकर्स गडाच्या माथ्यावर जात होतो.

steps in kothaligad fort

तो मोठ्ठा आणि सुंदर जिना पार केल्यावर एक अवघड पॅच येतो तिथे थोडे सांभाळून गेलेलेच बरे. कारण कोथळीगडावर आधारासाठी कुठेही लोखंडी पट्ट्या,खांब लोखंडी रेलिंग असे लावलेले आढळले नाही. फक्त दगड आणि पाषाण हाच एकमेव तिथे आपला आधार आहे हे ट्रेकर्सनी लक्षात असू द्यावे.

इतके शारीरिक श्रम घेऊन गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मनातील आंनद अवर्णनीय होता. परंतु आम्ही नुसती एक छोटी बॅग त्यात एक जेवणाचा डब्बा आणि प्यायचे पाणी घेऊन गड चढतो तर इतके दमतो. शिवकाळातील लोक त्यावेळी वजन सामान कसे चढत असावेत आणि कसे लढत असावेत हा विचार माझ्या मनात कायम येतो. गडावर पोहोचल्यावर लक्षात आले की वर एक पाण्याचे टाके आहे.

२-३ झाडे आणि निवडुंग आणि छोटी झुडपे आहेत. एका बाजूला भीमाशंकर चे पठार, सिद्धगड, पदरगड,एका बाजूला दूर माणिकगड चंदेरी, प्रबळगड दिसतात. दाटून येणाऱ्या ढगांमुळे लपाछुपीचा खेळ चालू असल्याचे भासत होते. बाकी सगळे गड एकमेकाला जोडलेले सक्ख्या-चुलत भावांसारखे एका डोंगर रांगेत दिसतात. कोथळीगड मात्र मूळ डोंगररांगेतून तुटून बाजूला एकटा सावत्र भावासारखा बाजूला आढळतो.

भीमाशंकरच्या पठारावर खूप साऱ्या पवनचक्क्या एका रांगेत सवाष्णी उभ्या असल्यासारख्या भासत होत्या. गडाच्या माथ्यावरच आम्ही दीड च्या सुमारास आपापले जेवणाचे डब्बे काढून छोटे छोटे ग्रुप करून ऊन सावलीच्या खेळात जेवण करून घेतले. कारण खूप गृप एकावेळी माथ्यावर पोहोचल्याने प्रत्येकासाठी तशी सावलीची जागा नव्हतीच शिवाय गडाच्या माथ्यावर जेवण करण्याचा आनंद काही आगळाच. जेवण आटोपून फडकणाऱ्या भगव्यासहित एक गृप फोटो काढून परतीच्या उतराईच्या वाटेला निघालो.

कोकणचे वैभव डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले. भन्नाट रानवारा अंगाला झोंबत असताना नकळत ओठांवर येतात त्या ओळी,

“भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली..”

उतराई करतानाच अनुभव अजूनच वेगळा होता. कारण तोच आतून कोरलेला जिना आता पाण्यातील भोवऱ्यासारखा भासत होता. आम्ही एका भोवर्यातून सुरक्षित खाली उतरलो.

गडमाथ्यावरून आम्हाला एक तोफ दिसली होती त्या तोफेजवळ गेल्याशिवाय आम्हाला राहवले नाही. त्या ठिकाणी अजून २ पाण्याची टाकी आहेत. तिथल्या एका पाण्याच्या टाकीत स्वच्छ पाणी होते तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पेठ गावच्या विहिरी आटतात तेव्हा त्या विहीरीमध्ये पाईपने सोडले जाते आणि ते पिण्यासाठी वापरले जाते.

water cistern kothaligad fort

आता या ठिकाणाहून कोथळीगड एका नरसाळ्याच्या आकाराचा भासत होता. इथे जरा वेगळ्याप्रकारची इनोवेटिव्ह फोटोग्राफी केली आणि ३च्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली. कितीही ट्रेक केले तरी उतरताना माझे पाय भरून येतात. तरीही पावले सपासप आणि आपोआप वेगाने पडून आम्ही पळू लागतो. आम्ही अक्षरशः पळतच होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही पेठ गावात आलो आणि बाकीच्या मेम्बर्सची वाट पाहत थोडी विश्रांती घेतली. आमच्या सोबत आमच्यातले काही मेंबर्स  लग्न करून त्यांच्या लाईफ पार्टनर ला सुद्धा ट्रेकिंग ला घेऊन आले होते.त्यांचे कौतुकच.४:१५ च्या सुमारास आम्ही पेठ गाव सोडले आम्हाला ३ कि. मी. अंतर पार करायचे होते. आणि उन्हाने आणि दमट वातावरणाने हैराण झालो होतो. तितक्यात आजूबाजूच्या डोगर रांगा धूसर दिसू लागल्या. डावीकडे ऊन तर उजवीकडे पाऊस भरला होता. आम्ही सकाळपासून पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. वरून राजाला आमची कीव आली आणि त्याने आमच्यावर पावसाच्या सरींची हलकी बरसात सुरु केली. हवेत अचानक खूप गारवा आला आणि “दिल खुश हो गया.”हलकी हलकी बारिश म्हणता म्हणता चांगला जोरदार पाऊस सुरु झाला. जणू चॉकलेटचे, दुधाचे धबधबे सुरु झाले कारण खडीच्या  रस्त्यावर माती टाकली होती ती वाहून जात होती आणि चॉकलेटच्या नद्या वाहताहेत असे भासत होते.

पाऊस पडल्याने एकीकडे पक्षांचा मंजुळ आवाज येत होता.  आम्ही ७-८ बडबडे ट्रेकर्सनी ३ की. मी. चे अंतर केव्हा कापले आमचे आम्हालाच समजले नाही. आंबिवली गावाजवळ बस लावली होती त्या ठिकाणी येऊन एका ठिकाणी पोहा नास्ता आणि चहा ची सोय केली होती. ते खाऊन सूर्यास्ताच्या वेळी आम्ही परतीची वाट धरली आणि अन्ताक्षरीच्या तालावर रात्री ९:३० वाजता पुणे गाठले.(अंताक्षरी खेळताना मात्र मागे बसलेल्या सीट वरच्या मुलांसोबत, अंताक्षरी किंग श्री राणेसर आणि मंदार सरांसोबत अजून एक मेम्बर अविनाश“तुसी छा गये”. अविनाश,,अरे काय खजिना आहे तुझ्याजवळ गाण्यांचा आणि काय सुरीला गातो तू. खरंच खूप छान. तुझ्या गाण्यापुढे आम्ही सगळेच फिके पडलो. ट्रेकलीडर राणेसर, मंदारसर, निकाळजेसर,तसेच विनोद-दीपिका,चेतन, मृणालिनी,हिरल,ऋतुजा,सुरेखा, राहुल-आदित्य, उत्तम आणि फ्रेंड,भावना,डॉ. श्रीकांत आणि सर्व नवीन ट्रेकर्सचे ट्रेक यशस्वी झाल्याबद्दल अभिनंद.    अश्या प्रकारे “फोना” ग्रुप चा १८ जून चा कोथळीगड ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पार पडला.

fona group at kothaligad

 

Filed Under: One Day Trek Tagged With: one day trek, trek, trekking, Weekend getaways

Comments

  1. रविंद्र says

    June 19, 2017 at 7:34 pm

    छान लेख.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book a Test Ride Today

Royal Enfield Test Ride 2025 120-600.jpg

Our site is hosted on Hostinger

Get Mega Discount on Hosting

Contact me

Contact Mahesh
About me

Good Read

Places in Pune
Backpack list - India
Travel Pack - India
Swiss from India

Archives

Interesting buy

Best Tent

We at Wikipedia

Where on Wiki ?

Copyright © 2025 ·TrekBook India

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.Accept Reject Read More
Privacy & Cookies Policy

Privacy Overview

This website uses cookies to improve your experience while you navigate through the website. Out of these, the cookies that are categorized as necessary are stored on your browser as they are essential for the working of basic functionalities of the website. We also use third-party cookies that help us analyze and understand how you use this website. These cookies will be stored in your browser only with your consent. You also have the option to opt-out of these cookies. But opting out of some of these cookies may affect your browsing experience.
Necessary
Always Enabled
Necessary cookies are absolutely essential for the website to function properly. This category only includes cookies that ensures basic functionalities and security features of the website. These cookies do not store any personal information.
Non-necessary
Any cookies that may not be particularly necessary for the website to function and is used specifically to collect user personal data via analytics, ads, other embedded contents are termed as non-necessary cookies. It is mandatory to procure user consent prior to running these cookies on your website.
SAVE & ACCEPT
Go to mobile version